Full Time पूर्णकालिकInternship इंटर्नशिप

Accountant

Company
Arihant Corporation · Textile Manufacturer
Location
Ichalkaranji
Posted
Salary
₹20,000 से ₹35,000 प्रति माह

Apply for this job आवेदन करेंShare on WhatsApp

अकौंटंट

अरिहंत कॉर्पोरेशन इचलकरंजी मधील अग्रगण्य टेक्सटाईल उत्पादक कंपनी आहे. आम्ही मुख्यत: कॉटन साड्या, रुमाल व धोती चे उत्पादन करतो. आमच्या टीम मध्ये जोडण्यासाठी आम्ही सध्या एक पात्र अकौंटंट शोधत आहोत . उमेदवार हा मराठी, हिंदी आणि इंग्रजी या भाषांमध्ये निपुण असावा, आणि त्याला किमान ३ वर्षांचा ‘बीजी’ Busy  या अकौटिंग सोफ्टवेअर मध्ये अनुभव असावा. सदर पदासाठी कार्यस्थळ हे 8/804, अरिहंत मनोर, शांतिनगर, इचलकरंजी असेल.

कार्यकाळ:

या पदासाठी कार्यकाळ खालीलप्रमाणे असेल:

सोमवार ते शनिवार: सकाळी 10:00 ते सायंकाळी 7:00.

रविवार: सुट्टी . (कधीतरी जर खूप काम बाकी असेल तर आम्ही अर्धा दिवस कार्यकाळ ठेवू शकतो.)

💰 वेतन (Salary):

  • ₹20,000 से ₹35,000 प्रति माह
  • वेतन कौशल, अनुभव और कार्यक्षमता के आधार पर तय किया जाएगा
  • इंटर्नशिप / प्रशिक्षण अवधि के दौरान वेतन कम हो सकता है, जिसे कन्फर्मेशन के बाद संशोधित किया जाएगा

कामाचे विवरण / जबाबदारी:

  1. वित्तीय व्यवहार संदर्भात : सर्व वित्तीय घेवाण देवाणी ची अचूक नोंद ठेवणे आणि कंपनीच्या धोरणांनुसार बीजी सोफ्टवेअर मध्ये सर्व एन्ट्री करणे.
  2. मालाच्या व्यवहार संदर्भात : सप्लायर / कारखानदार कडून आलेले ग्रे कापड, प्रोसेसमधून परत आलेल्या मालाचा पूर्ण अहवाल, वेळोवेळी रिपोर्ट मध्ये भरणें. मालाची सर्व प्रकारची आवक व जावक ची नोंद व अहवाल नियमित पणे तयार करणे.
  3. बँक स्टेटमेंट: सर्व बँक खात्यांच्या घेवाण देवाणी ची अचूक नोंद ठेवणे, बॅलन्स मिळवून घेणे.
  4. रिपोर्ट / अहवाल संदर्भात: बिल थकबाकी, स्टॉक अहवाल आणि मासिक जीएसटी रिपोर्ट / अहवाल तयार करणे. सी ए व कर सल्लागार यांशी संपर्क ठेवून योग्य कामे करणे.
  5. संवाद आणि सहभागीता: इतर कर्मचार्यांसोबत मनमिळाऊपणेवागणे व कंपनी च्या प्रगती साठी प्रयत्न करणे. ग्राहक व्यापारींसह बाकी रक्कम वसूली बाबत स्पष्टपणे व योग्य संवाद साधणे.
  6. स्टॉक व्यवस्थापन: स्टॉकची स्थिती, मूल्यमापन करणे आणि अनुरूप कारवाईंचे प्रस्ताव सादर करणे.

 

योग्यता:

  • लेखा, वित्त किंवा संबंधित क्षेत्रातील स्नातक पदवी.
  • ‘Busy’ सॉफ्टवेअरमध्ये अनुभव, कापड उद्योगामधील अनुभव असल्यास उत्तम.
  • अकाउनटिंग सिद्धांतांची आणि पद्धतीची चांगली ओळख.
  • मायक्रोसॉफ्ट एक्सेल आणि इतर मायक्रोसोफ्ट ऑफिस अॅप्लिकेशन्सची निपुणता.
  • मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तीन भाषांमध्ये लेखी व तोंडी कौशल्य.
  • तत्पर स्वभाव, व्यवस्थापन कौशल्य, संघटनेत सहकार्य करण्याची क्षमता आणि समस्या सोडवण्याची क्षमता.

← All open positions सभी खुले पद